पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात ह्मणजे सौख्य आणि समाधान यांचे साम्राज्य अशी यथार्थ म्हण संबंध युरोपमध्ये प्रसरत होती. युरोपमधील निरनिराळ्या राष्ट्रांतील प्रजाजन तेथील राज्यव्यवस्थेला कंटाळून तुर्की साम्राज्यांत येऊन राहत व आनंदाने कालक्रमणा करीत. एका प्रसिद्ध इतिहासकाराचे पुढील उद्गार अत्यंत मननीय आहेतः - | 4 हजारों हंगेरियन लोक आपआपल्या झोपड्यांना आगी लावून आपल्या मुलांबाळांसह तुर्की हद्दीमध्ये येऊन राहत. ?* त्याचप्रमाणे खालील उतारा लक्ष्यात ठेवण्यासारखा आहे. ६ त्यांच्या राजवटींत साहित्य, संगीत इत्यादि कला; तत्वज्ञान, राजनीति, जोतिष्य, न्याय इत्यादि शास्त्रे प्रकर्षास पोहोचली. त्यांच्या राज्यांत सुखाचा आस्वाद घेण्यास हंगेरी, रशिया इत्यादि परराज्यांतील प्रजाही आनंदाने येऊन राहत होती. ते इस्तंबूलचे सुलतान तत्कालिन ख्रिस्ती राजांपेक्षा अधिक सुसंस्कृत व प्रजाहित तत्पर नव्हते असे कोण म्हणेल ! " x पण पुढे या ख्यातनाम तुर्की सुलतानांच्या उत्कर्माला, पराक्रमाला, औदार्याला, कर्तबगारीला आणि आदर्श राजनीतील लवकरच दृष्ट लागली.तीनशे वर्षे शुक्लेंदुवत् वाढत जाणा-या उत्कर्षाला

  • * The Turks in Europe' by Allen, Page 40 । X* तुकचे साम्राज्य पान ४२

है।