पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असामान्य विभूती किंवा बडेजावीचा मनापासून तिटकारा होता. एका जर्मन ग्रंथकाराने त्यांच्या मनोवृतीचे मोठे हृद्य वर्णन केले आहे. तो म्हणतोः 4 ज्यांच्या पायाशी राजमुकूटें वाहण्यांत आली, कल्पनारम्य साम्राज्यांचे आमिष ज्यांना दाखविण्यांत आले.....त्या कमालपाशांनी आपला तोल जावू दिला नाही. त्यांच्याजवळ नेपोलीयन सारखा मनाचा कमकुवतपणा नव्हता. किर्तीच्या शिखरावर असतां त्या विजयी योद्धाचे रुपांतर शांततावादी नागारकांत झाले. किर्ती व बडेजाव याचा त्यांना तिटकारा होता. " x आपले इच्छित ध्येय तडीस नेत असतां कमालपाशांनी अत्याचाराचा अवलंब केला नाही हे लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतां अत्याचाराचे अस्त्र हातीं । घेतां कमालपाशांनी जी क्रांति घडवून आणली ती जगाला आदर्शवत होऊन राहण्यासारखी आहे. कमालपाशांना रक्तपात करावा लागला; पण तो राष्ट्राच्या संरक्षणासाठी परकीय शत्रूंशी झुंजतांना X " Semal Ata Turk, Page 228. ६५६ ।