पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा कमालपाशांनीं रणांगणावर ज्याप्रमाणे शत्रूसैन्य उधळून लावले, त्याप्रमाणे टेबलाभोवती गंभीरपणे बसून काथ्याकूट करणा-या मुत्सद्यांची मुत्सद्देगिरी धुळीस मिळविली आहे हे लासेन तहावरून आपणांस दिसून येईल. लासेन तह म्हणजे कमालपाशांनी युरोपियन मुत्सद्यांवर मिळविलेला विजय होय. मि. हडसन नांवाच्या आंतर्राष्ट्रीय राजकारणतज्ज्ञाने पुढील यथार्थ उद्गार काढले आहेत.

२४ जुलै १९२३ रोजी झालेल्या लोसन तहाने तुकचा विजय आणि दोस्त राष्ट्रांचा पराभव

जगजाहीर केला.” * कमालपाशांना वैयक्तिक मोठेपणाचे कधीच महत्व वाटले नाही. आपण मोठे योध्दे आहोत, आपल्या राष्ट्राचे उद्धारकर्ते आहोत, किंवा आपण महान मुत्सद्दी आहेत, असा सकारण गर्व त्यांना चुकून देखील शिवला नाही. ' आपण होतो म्हणूनच आपले राष्ट्र जिवंत राहिले, अशी फुशारकी मारून आपला कमकुवतपणः प्रदर्शित केला नाही. त्यांना कितींचा, मोठेपणाचा ।* * Turkey, Grece & Eastern Meditarranean by G, E, Hudson, Page 22. ४१५८