पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असामान्य विभूत। नेहरू काळेपशांच्या या तत्वनिष्ठेबद्दल म्हणतात:---

  • तुर्कस्थानाकरितां स्वातंत्र्ययुद्ध करीत असतांना कमालपाशांनी तुर्केतर राष्ट्रे किंवा प्रान्त जिकण्याचे ध्येय आपल्यासमोर कधीच ठेविलें नाहीं. फक्त तुर्कस्थानापुरतेच चिकटून राहण्यांत त्यांनी अत्यंत

शहाणपणा प्रदर्शित केला आहे. * कमालपाशांमध्ये शौर्य व मुत्सद्देगिरी यांचा दुर्मिळ पण मधुर मिलाफ होता. कमालपाशा हे नुसते अव्वल दर्जाचे लढवय्ये नव्हते; तर बुद्धिमान मुत्सद्दीही होते. लढवय्या हा सर्वसाधारणपणे बद्धहीन समजला जातो. मुत्सद्यांनीं बेत करावे व ते लढवय्याने पार पाडावे अशी वस्तुस्थिती असते. पण कमालपाशांमध्ये हे दोन्ही गुण उत्कटतेने वसत होते. असहाय्य तुर्कस्थानाविरुद्ध सर्व दोस्त राष्ट्र एकवटली असतां, आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर कमालपाशांनी त्यांना नामोहरम करून टाकले.

  • एकट्या कमालपाशांनी दोस्त राष्ट्रांच्या शक्तिस तोंड दिलें व धूर्तपणाने त्यांचा पराभव केला. "x

Glimpses of World History " by Pandit Ja Yaharlal Neharu”, Page 155.

  • “One Hundred Great Lives", Page 751,

१५७