पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा किंवा ज्याचे उद्देश राष्ट्रीयत्वास पोषक असतात, ते राष्ट्र कधीही आंतर्राष्ट्रीय भानगडीत पडत नाही. आपल्या राष्ट्राच्या कक्षेबाहेर जे प्रश्न किंवा भानगडी असतात त्यापासून ते राष्ट्र सदैव अलिप्त असेच असते. या तत्वाला अनुसरून युरोपियन राष्ट्रांच्या सामथ्यसंघांत ( Group of Powers ) कमालपाशा कधीही सामील झाले नाहींत. आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाकरिता किंवा कल्याणाकरिता झटावयाचे सोडून दुसन्या राष्ट्रावर विनाकारण आक्रमण करणे हा राजकीय गुन्हा आहे असे कमालपाशा समजत. याचकरितां तुर्की साम्राज्यांतून फुटून निघालेल्या इजिप्त, इराण, इराक वगैरे राष्ट्रांवर आक्रमण करण्याचा विचार त्यांच्या मनांत कधीही आला नाहीं. युरोपियन राजकारणात तुर्कस्थानाचे प्रस्थ व सामथ्र्य वाढल्याबरोबर, तुर्कस्थान आपल्या साम्राज्यांतून फुटून निघालेल्या राष्ट्रांवर आक्रमण करणार, असे मोठमोठ्या मुत्सद्यांनी भाकित केले होते; पण कमालपाशा पक्के तत्वनिष्ठ असल्यामुळे ते खोटे ठरले. उलट त्या त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य प्राप्त झाले याबद्दल त्यानीं समाधान व्यक्त केलें. इतकी उदारवृत्ती प्रदर्शित केल्याचे हे युरोपियन राजकारणांतील पहिलंच उदाहरण होय. सुप्रसिद्ध हिंदी पुढारी पंडित जवाहरलाल १९१६