पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्य विभूर्त दाखविलेले अभूतपूर्व असे राजकीय, सामाजिक व धार्मिक परिवर्तन, सारे जग आश्चर्याने थक्क होईल असा त्यांनी केलेला आपल्या राष्ट्राचा कायापालट या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केला म्हणजे जगांतील मोठमोठे राष्ट्रधुरीण कमालपाशांपुढे निष्प्रभ ठरतात. या राष्ट्रधुरीणांप्रमाणे हुकूमशहा बनून अनियंत्रित सत्ता गाजविण्याची कल्पना कमालपाशांस कधीही शिवली नाही किंवा राष्ट्राने आपल्या टाचेखाली राहावे असा उन्मत्त विचार त्यांनी कधीही बाळगला नाही. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रास स्थैर्य । लाभल्यानंतर, एकेकाळीं वैरी असणाच्या राष्ट्रांवर गुरगुरण्याची किंवा लहान लहान राष्ट्रांवर आक्रमण करण्याची दुष्टबुद्धि कमालपाशांना कधीही झाली नाही. • जगांमध्ये राष्ट्र म्हणून तुर्कस्थानास सुखाने व इज्जतीने कसे जगता येईल' हा एकच एक उदात्त विचार त्यांच्यापुढे होता.

  • फक्त आपल्या राष्ट्राचा उत्कर्ष व सौख्य में प्रधान ध्येय कमालपाशांनी आपल्या समोर ठेविल्यामुळे दुसन्या राष्ट्रांच्या आत्यंतिक हितसंबधांस जपणे हे आपले कर्तव्यकर्म आहे असे कमालपाशा समजत. ज्या राष्ट्राचे ध्येय निर्भेळ राष्ट्रीयत्व असते

१५६