पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३२ वें -- -- असामान्य विभूती ६० कमालपाशांचा उल्लेख केला की जगद्विख्यात झालेल्या हल्लींच्या मोठमोठ्या राष्ट्रधुरीणांची मालिका नजरेसमोर उभी राहते. आपच्या झोटिंगशाही वृत्तीने या राष्ट्रधुरीणांनी स्वतःविषयी घृणा उत्पन्न केल्यामुळे सध्यांचे राष्ट्रधुरीण म्हणजे एका माळेचे मणी असा ग्रह होणे स्वाभाविक आहे. पण कमालपाशांच्या चरित्राचे काळजीपूर्वक परिशीलन केल्यानंतर वरील दूषित गृह बदलणे भाग पडते. कमालपाशांनी आपल्या राष्ट्रांत आमूलाग्र क्रांति करण्याचे विचारपूर्वक ठरविलेलें ध्येय, तें प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी स्विकारलेला प्राणांतिक धोक्याचा मार्ग, आत्यंतिक निराशेच्यावेळी त्यांनी प्रदर्शित केलेले असामान्य धैर्य, भावनावश न होता त्यांनी दाखविलेला प्रशंसनीय बुद्धिवाद, एकाच वेळी त्यांनी करून