पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयुष्याचा शेवटै राष्ट्रांच्या प्रतिनिधीनी कबरेवर आपआपल्या राष्ट्रातर्फे हार घातले. नंतर अफाट जनसमुदाय जड अंतःकरणाने परत फिरला. कमालपाशांचे अभूतपूर्व व प्रभावी आयुष्य संपले; पण त्या आयुष्याने मृतप्राय झालेल्या एका राष्ट्रास नवजीवन दिले, गुलाम । व लाचार झालेश्या लोकांना गदगद हलवून जागे केले, ऐदी । व बुरसलेल्या मनोवृत्तींना सप्तपाताळांत गाडून टाकले, घमध झालेल्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले, आपल्या मर्जीप्रमाणे जगाचा नकाशा बदलला पाहिजे अशी वल्गना । करणाच्या मुत्सद्यांचा दिमाख उतरून टाकला, पारतंत्र्यांत पिचत पडलेल्या अभागी लोकांत चेतना निर्माण केली आणि असंख्य स्वातंत्र्योपासकांच्या हृदयांत अढळ व उच्च स्थान मिळविलें. तुर्कस्थानाच्या परिस्थितीचा व कमालपाशांच्या आयुष्यकथेचा बारकाईने विचार केला तर अगदी अलिकडच्या शतकांत कमालपाशांइतके कीर्तिशिखर कु गांउलें नाहीं असे आपणांस निर्विवाद म्हणावे लागेल. - '"- -" , २५३