पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कभाळपाशी ठिकठिकाणी दु:खवट्याच्या सभा भरविण्यात आल्या. हिंदुस्थानामध्ये तर सर्व मताच्या, सर्व धर्माच्या जनतेकडून शोक प्रदर्शित करण्यांत आला. राष्ट्राध्यक्ष बाबू सुभाषचंद्र बोस यांनी ता. १९ हा दिवस 5 कमाल दिन " म्हणून सर्व हिंदुस्थानभर पाळण्यात यावा अ फर्मान काढले. तुर्की जनतेच्या दुःखास तर पारावार राहिला नाही. राष्ट्राच्या कानाकोप-यांतून लोकांच्या थवेच्याथवे आपल्या उद्धारकर्याच्या दर्शनास येऊ लागले. पोलीसांना बंदोबस्त करणे अशक्य होऊन गेले. शेवटी एका प्रशस्त जागी कमालपाशांचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले. लाख तुर्की प्रजाजनांनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन घेतले. इस्लामी पद्धतीप्रमाणे शेवटची ५ जनाजा नमाज पढविण्यांत आत्यावर प्रशनयात्रा निघाली. स्मशानयात्रेस लाख लोकांचा जनसंमई लोटला होता. पावलागणीक शवास हार घालण्यात येत होते. पुढे पुढे तर इतनै गर्दी वाढली की, ५ त्या गर्दीत ११ लोक चिरडून मेले '* शेवटी एका सुंदर कबरीमध्ये कमाळपाशांचा दफनविधी करण्यात आला. दफनविधी झाल्याबरोबर निरनिराळ्या

  • * 1llustrated Weekly of India", 18 Dec. 1938

६५३