पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयुष्याचा शेवट कमालपाशानी डोळे उघडले; त्यांचे ओंठ हलू लागले; क्षीण आवाज ऐकू येऊ लागला; आणखी जास्त निस्तब्धता पसरली. | १६ माझ्या अत्यंत प्रिय व लाडक्या राष्ट्रास चांगल्या अवस्थेत सोडून जात आहे याबद्दल मला अत्यंत समाधान वाटते. मी जे कार्य हाती घेतले होते ते कार्य यथाशक्ति पूर्ण करून मी मोठ्या आनंदाने परमेश्वराच्या घरी जात आहे. राष्ट्राचा संभाळ करा.....* आवाज क्षीण होत होत हवेत विलीन झाला. जमलेल्या सर्व लोकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. मालपाशांच्या भगिनींना हुंदका आवरेना. पुन्हां हालचाल सुरू झाली. मालपाशानी डोळे उघडले व स्पष्ट आवाजांत • कल्में शहादत, ' म्हणून कायमचे डोळे झाकले. जगास वंद्य होऊन राहणारा आत्मा परमेश्वर चरणीं विलीन झाला. एका क्षणांत एकच हाहाःकार उडाला. रोडयोवरून कमालपाशांच्या मृत्यूची बातमी सर्व जगभर कळविण्यांत आली. सगळीकडे दु:खाची छाया पसरली. जगांतील प्रत्येक राष्ट्राकडून दुखवट्याचे संदेश पाठविण्यांत आले.

  • * अतातुर्क : ले. मुनशी नदीम फिरोझपुरी, पृष्ठ १५७

३५१