पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा | |

  • तुर्कीनीं प्रकट केलेल्या उदार राजनीतीपासून सुधारलेल्या युरोपियन राजांनी अवश्य बोध घ्यावा. प्रजेचा धर्म, जीवित व वित्त यांस धक्का न लावणे, किंबहुना तिच्या द्रव्यार्जनाची आणि योगक्षेमाची जी जी म्हणून साधने असतील ती ती प्रजेपाशी अबाधित राखणे हे धर्मशील, नीतिमान व स्वहिततत्पर राजे आपले कर्तव्य समजतात. सुलतानांच्या राज्यांत पॅट्रीआर्क हा ख्रिस्ती धर्माधिपति होताच. ख्रिस्ती धर्माप्रमाणेच ख्रिस्त्यांच्या कायदेकानूत, रीतीभातींत, वहिवाटींत व सामाजिक समारंभांत सुलतानांनी मुळीच हात घातला नाहीं.यामुळे ख्रिस्त्यांस मनसोक्त धर्माचरण करतां आले, पैसा कमावितां

आला आणि संतती वाढवितां आली. " * तुर्की सुलतानांची उदार राजनीती ही जगांत आदर्शवत् समजली जाते. प्रजेचे कल्याण तेच आपले कल्याण, प्रजेचा आनंद तोच आपला आनंद, प्रजेचे सौख्य तेच आपले सौख्य, या महान तत्वाचा तुक सुलतानांनी अवलंब केला होता. तुर्की साम्राज्य

  • ** तुर्कोचे साम्राज्य : पान ४०-४१