पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी आलश पण कमालपाशांना आराम वाटण्याचे चिन्ह दिसेना. कमालपाशांनी अध्यक्षपदाचा राजिनामा २९ अक्टोबर रोजी अँड नॅशनल असेंब्लीकडे पाठवून दिला; परंतु असेंब्लीने कमालपाशांचा राजीनामा मंजूर केला नाहीं. • कमालपाशा जिवंत आहेत तोपर्यंत ते तुर्की प्रजासत्ताक राज्याचे अध्यक्ष राहिले पाहिजेत' असा कृतज्ञतेने भरलेला ठराव असेंब्लीने मंजूर केला. कालपाशांच्या हयातीत दुसरा अध्यक्ष निवडावा ही कल्पनाही राष्ट्रप्रतिनिधींना सहन झाली नाहीं. कमालपाशांच्या लोकप्रियतेचा बापे जास्त पुरावा कोणता पाहिजे ! रमझानचा पवित्र महिना आणि ता.१ ० नोव्हेंबर १९३८चा तो दिवस. कमालपाशांचा अंत:काल समॅप आला. तुर्की जनतेच्या अंतःकरणाची कालवाकालव सुरू झाली. सबंध राष्ट्रावर दु:खाची व निराशेची घनदाट छाया पसरली. कमालपाशांच्या बिछान्या भोंवतीं डॉक्टर, त्यांची बही; मकबुला, मुख्य प्रधान इस्मन इनून, असेंब्लीचे अध्यक्ष व सर्व मंत्री हजर होते. बाहेर अफट जनसमुदाय जमला होता. सबंध वातवांत भयाण निस्तब्धता पसरली होती.