पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३१ वें --- आयुष्याचा शेवट आपल्या राष्ट्राच्या उद्धाराकरितां अविश्रांत केलेल्या पारिश्रमांचा पारणाम कमालपाशा यांच्या प्रकृतीवर होऊ लागला. डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांती घेण्याबद्दल त्यांना किती वेळां तरी बजावले असेल; पण त्याचा कांहीं एक उपयोग झाला नाहीं. * आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या परमप्रिय राष्ट्राकरिता झटणे हे माझे महान व पवित्र कर्तव्य आहे असे मी समजतो " अशा शब्दांत डॉक्टर लोकांची ते बोळवण करीत. शेवटीं सन १९३८ सालच्या आक्टोबर महिन्यांत त्यांची प्रकृति ढांसळली व त्यांनी बिछाना. धरला, त्यांच्या प्रकृतीला आराम वाटेना. औषधी इलाजाची परमादाध होत होती. प्रत्येक मशिदीमध्ये अतातुर्क यांना आराम वाटावा म्हणून दररोज प्रार्थना सुरू झाल्या. युरोपमधील नामांकित डॉक्टरांचे उपचार सुरू झाले.