पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गा। मालपाशा | सन १९३६ सालीं तुर्कस्थानाच्या इतिहासांत सोन्याच्या अक्षरानी लिहून ठेवण्यासारखा महत्वाचा प्रसंग घडून आला. महायुद्धानंतर दादनेलीस व बास्फरस सामुद्रधुन्या व त्या सामुद्रघुन्यावर असणाच्या किल्लयांचा ताबा तुर्कस्थानाकडून काढून घेण्यांत आला होता. हा अत्यंत महत्वाचा ताबा आपणांस मिळावा म्हणून कमालपाशांनी प्रयत्न सुरू केलं. सुदैवाने या प्रयत्नांस लवकरच यश येऊन तुर्कस्थानाला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. जुलै सन १९३६ सालीं मांट्रो कॉन्फरन्स भरून त्या कॉन्फरन्समध्ये सामुद्रधुन्या, तुर्कस्थानाच्या ताब्यात, बिनशर्त देण्याबद्दल तहनामा झाला. या कॉन्फरन्समध्ये जमलेल्या युरोपीयन राष्ट्रांच्या प्रतिनिधींना तहनाम्यावर सह्या करण्यांकरितां तुर्की सरकाराकडून सोन्याचा फाऊंटनपेन्स नजर करण्यात आली. | माँटो कॅन्फरन्समध्ये बास्फरसे व दादनेलीसवर ताबा मिळाल्याबरोबर एका क्षणांत तुक राष्ट्राप्त विलक्षण महत्व प्राप्त झाले. रशियासारख्या बलवान राष्ट्रास व भूमध्य समुद्रालगत असणा-या प्रदेशांस तुर्क राष्ट्राची आराधना करण्याची जरूरी भासू लागली. ४ ४ " Islam in the World", Page 263, M