पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अतातुर्क नव्हती. कमालपाशांनीं ग्रीकांविषयी आपला राग गिळून टाका ब मैत्रीचा हात त्यांच्यापुढे केला. कमालपाशा अभिजात शांततावादी असल्याकारणाने, त्यांच्या अंत:करणांत द्वेषाला मूळ धरावयास जागा नव्हती. प्रसंगाबरोबरच सर्व कांही विसरून जाण्याची त्यांची खेळाडूवृत्ती होती. या वृत्तीला अनुसरून, त्यांनी ग्रीक राष्ट्राबरोबर स्नेहाचे व प्रेमाचे नवे नातं जोडले व ते यशस्वी करून दाखविले. अनेक अप्रिय स्मृतींना मूठमाती देऊन, कमालपाशांनी अगदी अलीकडे ब्रिटिश साम्राज्याची नवा व महत्वाचा स्नेहसंबंध मोडला. ब्रिटिश साम्राज्याचे बादशहा, हिज मॅजेस्टी आठवे एडवर्ड यांनी सप्टेंबर १९३६ मध्ये तुर्कस्थानास भेट देऊन हे स्नेहसंबंध अधिक दृढ केले. | कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल) मध्ये एडवर्ड बादशहांचा अभूतपूर्व असा सत्कार करण्यांत आला. भव्य अशा राजप्रासादांत एडवर्ड बादशहा व कमालपाशा यांनी प्रेमाने हस्तांदोलन केले. ब्रिटन व तुर्की राष्ट्र यामध्ये अभेद्य स्नेहसंबंध राहावा हाच त्या हस्तांदोलनाचा अर्थ होता. एकेकाळीं शत्रू असणाच्या दोन राष्ट्रांच्या प्रतिनिधींचा स्नेहसोहळा पाहून, तेथून जवळच गलीपोळीच्या धारातीर्थी पडलेल्या लाखों ब्रिटिश व तुर्की सैनिकांच्या आत्म्यास खात्रीने समाधान व सौख्य वाटले असेल. १ )