पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमळपाशी आपत्यास विरोध करणारा एकही पक्ष नाही म्हणून मन मानेल तसा राज्यकारभार करण्याचा झोटींगशाही विचार कमालपाशांच्या मनास कधीही शिवला नाहीं; किंवा सर्वाधिकारीत्वाच्या जोरावर वाटेल तो धिंगाणा घालण्याची बुद्धीही त्यांना झाली नाही. आपले राष्ट्र उत्कृष्ट दर्जाचे कसे होईल, आपली राजवट आदर्शवत कशी बनेल या उच्चविचारांत ते सदैव गढून गेलेले असत. अविश्रांत परिश्रम करून कमालपाशांनी ते विचार प्रत्यक्ष अमलात आणून दाखविले हे खालील उता-यांवरून सिद्ध होईल. 4 राज्याची सबंध पद्धत दुरुस्त केली गेल्यामुळे कित्येक वर्षे त्रस्त झालेल्या तुर्कस्थानाला अत्यंत कार्यक्षम अशा राज्यपद्धतीचा लाभ झाला....गेली दहावर्षे कमालपाशांनीं तुर्कस्थानावर अत्यंत शहाणपणाने राज्य केले आहे.” * * तुर्कस्थानामधील राज्यपद्धती नुसती सुधारली गेली नाहीं तर तिने थोड्या वेळांत व अशा पद्धतीने इतकी झपाट्याने प्रगती करून घेतली

  • * Concise FIistory of tho World", Page 36.

३४३