पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई अतातुर्क विश्वास होता. कमालपाशांचे, आपल्या उद्धारकत्यचे कर्तृत्व हाणून पाडण्याकरितां, त्यांचे नेतृत्व छिनावून घेण्याकरितांच हा विरोधीपक्ष निर्माण झाला आहे अशी सर्वसाधारण जनतेची कल्पना झाल्यामुळे, विरोधी पक्षांतील उमेदवारांवर जनता खवळून गेली. विरोधीपक्षाचा उमेदवार भेटेल तेथे बडवून काढण्याचे प्रकार सर्वत्र सुरू झाले. मतयाचना करणे दूरच पण घराबाहेर पडण्याचे उमेदवारांना मुष्कीलीचे झाले. शेवटी या उमेदवारांना पोलीसांचे संरक्षण घ्यावे लागले. नाईलाजाने, विरोधी पक्षाचे नेते फतेही यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला. | अशा रीतीने असेंब्लीमधील विरोधी पक्षाचा, निवडणूक होण्यापूर्वीच पुरता बोजवारा उडाला. शेवटी नाईलाजाने असेंब्लीमध्ये एकच पक्ष कायम ठेवणे भाग पडले. या प्रकारामुळे, कमालपाशांच्या नांवानें अहर्निश खडे फोडणा-या व त्यांच्या राजवटीवर बेगुमान टीका करणाच्या लोकांची तोंडे मात्र कायमची । बंद झाली. ५ कमालपाशांच्या कट्टर विरोधकांना कबूल करावे । लागेल की जगांत अशक्य वाटणारी गोष्ट कमालपाशांच्या राजवटीत शक्य होऊ शकते १४ असे जे एका ग्रंथकाराने उद्गार काढले आहेत ते अगदी यथार्थ आहेत, असे म्हणावे लागते. | * * Kemal Ata Turk", Page 245. ३४३