पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असातुर्क आहे की, युरोपांतील कित्येक राष्ट्रांना त्याबद्दल हेवाच वाटावा.” x कमालपाशांनीं तुर्कस्थानावर केलेच्या महान उपकारांतून, अंशतः का होईना, उतराई होण्याकरितां, नॅशनल अँड असेंब्लीने तारीख २४ नोव्हेंबर १९३४ इसवी रोजी त्यांना ६६ अतातुर्क " ( तुकचा पिता ) अशी बहुमानाची पदवी अर्पण केली. कमालपाशांच्या सन्मानार्थ सर्व राष्ट्रभर आनंदोत्सव करण्यांत आला. कमालपाशांच्या दर्शनाकरितां राजधानीमध्ये तुर्की जनतेची रीष लागून राहिली होती. कमालपाशांनीं तुर्की जनतेस दर्शन दिले. कमालपाशांना पाहतांच जनता आनंदाने वेडी झाली व तिने कानठळ्या बसेपर्यंत त्यांच्या नांवाचा जयजयकार केला, कमालपाशा म्हणाले:---

    • माझ्या देशबांधवांनो, माझ्या मूर्तीकडे पाहून आनंद व्यक्त करू नका. माझ्या ध्येयाशी व कल्पनाशी समरस होण्याचा प्रयत्न करा. माझे तुमच्यावरील प्रेम अढळ व शाश्वत आहे.

आपल्या परस्पर प्रेमांतच खरे सामर्थ्य आहे. नव्या युगांत आपला देश, आपले राष्ट्र श्रेष्ठ व उन्नत झाले पाहिजे." ४ " Kemal Ata'I'urls", Page 245, ६४६