पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोष्चात सुलतान सुलेमान यांचे आरमार अत्यंत प्रबळ होते. त्यावेळी युरोपमध्ये स्पेनचे आरमार अजिंक्य समजले जात असे; पण स्पेन व व्हेनीसचे आरमार एकत्रित झाले असतांही त्यावर तुर्कीनी विजय मिळविला व भूमध्यममुद्रावर आपल्या आरमाराचे स्वामित्व प्रस्थापित केले. आपल्या आरमाराच्या जोरावरच सुलतान सुलेमान यांनी त्रिपोली व अल्जेरिया हे प्रांत मिळविले. त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस * तुकी साम्राज्यांत रुमानिया, सहिया, बोस्निया, बल्गेरिया, ग्रीस, श्रेस व भूमध्यसमुद्रातील बेटे मोडू लागली. इराण, आर्मेनिया, मेसापोटेमिया, इराक, इजिप्त, आर्जेरया, ट्युनिस, मोरोक्को, अरबस्थान यांवर तुर्की निशाण फडकू लागले. युरोखंडाच्या पाऊणपटीएवढे राज्य तुर्की सुलतानांनी स्थापिलें. " * एवढ्या प्रचंड तुर्की साम्राज्यावर सुलेमानादि तुर्की सुलतानानीं अत्यंत न्यायीपणाने राज्य केले. आपल्या प्रजाजनांस न दुखवितां त्यांनी राज्यशकट यशस्वीरीतीने हांकला. विशेषतः परधर्मीय प्रजाजनांचे हक्क पायदळीं न तुडविले जातील याविषयी त्यांनी अत्यंत खबरदारी घेतली.तुर्की सुलतान परधर्मीय प्रजाजनांशी किती न्यायाने . वागत होते हैं खालील उताच्यावरून स्पष्ट होत आहे.

  • “तुकचे साम्राज्य पान ३८