पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अतातुर्क मी कमजोर समजतो. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकानें आपआपला धर्म खुशाल आचरावा. माझ्या राज्यांतील : प्रत्येक व्यक्तीस मी पूर्ण धर्मस्वातंत्र्य दिले आहे. " । कमालपाशा इस्लामधर्माविरुद्ध आहेत; त्यांनीं धर्म पायाखाली तुडविला आहे असा जो आक्रोश केला जातो त्याच्या बुडाशी बरेचसे राजकारण आहे. कमालपाशा सारख्या पराक्रमी व स्वातंत्र्यवीरास जगांतील मुसलमानांची व मुसलमान राष्ट्रांची सहानुभूती मिळू नये या उद्देशानेच कमालपाशा विरुद्ध जहरी प्रचार सुरू झाला होता; आणि या प्रचारास धर्माध व अक्कलशून्य मुल्लामौलवीनी हातभार लावल्यामुळे सबंध इस्लाम जग कमालपाशांविरुद्ध आहे, अ भासविण्यात येत होते. पण कमालपाशांच्या मृत्यूनंतर कमालपाशांबद्दल इस्लामी जगाला किती आदर वाटतो हे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. तुर्कस्थानामध्ये दहा वर्षे वास्तव्य करणाच्या मिस् रुथ वुडस्माल या पाश्चात्य लेखिकेनें, कमालपाशांच्या धर्मविषयक धोरणाचे स्पष्टपणे आविष्करण केले आहे. त्या म्हणतातः-- १३९