पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा पुरता बमोड करण्यात आला. ठिकठिकाणी लपूनछपून प्रचार करणाच्या मुलामौलवींना अटक करण्यांत येऊन त्यांची तुरुंगांत रवानगी करण्यात आली. अशा रितीने कमालपाशांच्या विरुद्ध निष्कारण उठविलेलें भूत एकदाचें कायम गाडले गेले, आणि कमालपाशा धर्मशत्रू आहेत अशी धादांत खोटी ओरड सारखी चालू होती ती आपोआप बंद पडली. कमालपाशांच्या धर्मासंबंधी कल्पना स्पष्ट व सडेतोड होत्या. राष्ट्रावर सर्व धर्माच्या लोकांचा सारखाच हक्क असल्यामुळे कुठलेही राष्ट्र एकधर्मीय होऊ शकत नाही किंबहुना धर्मभेदातीत राष्ट्र असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. धर्माबद्दल त्यांना अनादर नव्हता पण धर्माच्या नावावर ज्या चीड आणणाच्या गोष्टी घडतात त्यावर आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देणाच्या धर्मांध, ढोंगी आणि प्रतिगामी मुल्लामौलवींवर मात्र त्यांचा रोष होता. खरा धर्म जाणणाच्या, उदारमतवादी मुल्लामौलवा विरुद्ध त्यांनी कधीही अनादर दाखविला नाहीं, कमालपाशांचे धर्मासंबंधी खालील विचार अत्यंत मननीय आहेत. ते म्हणतात, “ धर्माचा गैरउपयोग करून घेण्यामुळेच सर्व संकटें उपस्थित होतात. राज्य करते वेळी ज्याला धर्माचे साहाय्य अवश्यक वाटते तो मनुष्य ६६