पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

জীববিজ্ঞ स्वीकारले, ही धर्ममार्तंड नक्शबंदी या नावाने ओळखला जात होता. कमालपाशांचे राज्य में सैतानाचे राज्य आहे; या राज्याला नेस्तनाबूद करून अल्लाचे राज्य प्रस्थापित करण्याचा आपला इरादा आहे-नव्हे अल्लाची आज्ञा आह–अशा प्रकारचा जाहीर प्रचार सुरू केला. दुर्दैवाने त्याला अनुयायी पण बरेच मिळू लागले. एक दिवस भर बाजारांत या धर्ममार्तंडाने कमालपाशा विरुद्ध प्रचार चालविला होता. त्याचवेळीं लेफ्टनंट कुबला नांवाचे एक लष्करी अधिकारी जात होते. कमालपाशांची व त्यांच्या राजवटीची निंदा सहन न होऊन त्यांनी त्या धर्ममार्तंडास आपले भाषण बंद करण्यास सांगितले. त्यांच्याकडे लक्ष्य न देतां धर्ममार्तंडाने आपले प्रवचन पुन्हा सुरू करतांच लेफ्टनंट कुबला यानीं त्या धर्ममार्तडास व्यासपीठावरून खाली ओढले. त्याबरोबर तेथे जमलेच्या लोकांनी व मुल्लामौलवीनी लेफ्टनंट कुबल यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले व त्यांचे शिर तोडून एक भाल्यावर अडकवेले. नंतर त्या धर्ममार्तंडाने व गुलामौलवीनीं प्रमुख रस्त्यांमधून ते शिर भिरवित नेले. अंगोरा येथे ही भयानक बातमी पोहोंचतांच ताबडतोब कर पाठविण्यात येऊन त्या धर्मातीचा व त्यांच्या अनुयायांचा ३३%