पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वषाणा त्याचप्रमाणे कमालपाशांनी प्रशंसनीय लष्करी सुधारणा केल्या. तुर्कस्थानाचे लष्करी सामथ्र्य सर्व दृष्टीने कार्यक्षम व्हावे याकरितां कमालपाशांनी अतिशय परिश्रम घेतले. युरोपांतील अव्वल दर्जाच्या लष्करी सामथ्र्याबरोबर टक्कर द्यावयाचा प्रसंग आला तर आपणांस कच खाण्याचा प्रसंग ऊं नये किंवा हताश होऊन बसण्याची पाळी येऊ नये म्हणून कमालपाशांनी आपल्या राजवटीच्या सुरवातीपासूनच अत्यंत खबरदारी घेतली. सैन्याप्रमाणेच आरमार व हवाईदल यांमध्ये कमालपाशांना अद्यावत सुधारणा करून तुर्की लष्करास युरोपामध्ये पहिल्याप्रतीचे स्थान प्राप्त करून दिले. एका आंग्ल साप्ताहिकांत ४ "How strong is Turky" या मथळ्याखालीं पुढील महत्वाचा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. 4 खास तज्ज्ञाकडून लष्कराचे प्रत्येक खाते अद्यावत केले गेले आहे............तुर्कस्थानामध्ये दारुगोळा, स्फोटक द्रव्ये आणि हत्यारे-पात्यारे तयार करण्याचे अनेक कारखाने सुरू झाले आहेत. x“ Illustrated Weekly of India", 3 Dec. 1939, ३३३