पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी मालपास तुर्कस्थान निःसंशय बलवान झाला आहे. त्याच्या लष्करी सामर्थ्याने इज्जत मिळविली आहे. तुर्कस्थानाचे हल्लीचे आरमार पूर्वीच्या बादशाही आरमारापेक्षां अत्यंत विश्वासाचे व कार्यक्षम आहे. तुर्की आरमार म्हणजे समुद्रावरील एक उत्कृष्ट प्रतीची व सन्मान्य अशी लहानशी शक्ति होय." विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुर्कस्थानाच्या वैमानिक दुलांत तुक स्त्रियांचा झालेला समावेश होय. तुर्की पुरुषांच्या बरोबरीने व तितक्याच कार्यक्षमतेने तुर्की मुसलमान स्त्रिया वैमानिक दलांत काम करीत आहेत. ६ या वैमानिक स्त्रियांचा पुढारीपणा कमालपाशांच्या मानलेल्या कन्यका लेफ्टनंट सबीहा गोकन या पराक्रमी व धाडसी मुसलमान स्त्रीकडे आहे. ४ अगदी अलीकडे तर, तुर्की स्त्रियांनी याहिपुढे मजल मारली आहे. हल्ली तुर्की सैन्यांत हजारों पॅरॉशूट ( छत्रीधारी ) तुर्की स्त्री सैनिकांचा समावेश झाला आहे. आजपर्यंत, पॅराशूट सैनिक होण्याचे प्राणांतिक धाडस फक्त पुरुषच करीत; पण तुक स्त्रियांना x" Illustrated Weekly of India", 23 Oct, 1933. १३४