पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझौ कमालपाशा असे. त्यांच्या मृत्युसमयीं हंगेरी, पोलंड, रुमानिया व सबंध आशियामायनर म्हणजे युरोपखंडाच्या ३ भागावर त्यांचे वर्चस्व होते. फत्तेमहंमदनंतर त्यांचे चिरंजीव बायजीद ( दुसरे ) गादीवर बसले, त्यांनी एकवीस वर्षे राज्य केले. त्यांच्या मृत्यूनंतर सलीम गादीवर आले. सलीम यांनी अवघी ८ वर्षे राज्य केले; पण त्यांची ८ वषाची काराकई अत्यंत देदिप्यमान ठरली. त्यांनी आशियाखडाकडे आपला मोर्चा वळविला. त्यावेळी आशियामध्ये आर्जक्य समजली जाणारी इराण व इजिप्त ही राष्ट्रे सलीम यांनी जिंकली. त्याकाळपर्यंत इजिप्तचा बादशहा मुसलमानांचा खलीफा होता; पण सलीम यांनी खलीफाचा मान त्याच्यापासून काढून घेतला व ते स्वतः खलीफा बनले. सुलतान सलीमपासून खिलापत तुर्कस्थानमध्ये आली । तुर्की इतिहासात अजरामर होऊन राहणारे सुलतान सुलेमाने यांचा जन्म सलीम यांच्या पोटी झाला. सुलतान सुलेमान यांनी बेचाळीस वर्षे राज्यापभोग घेतला. कित्येक नवे प्रदेश जिंकून त्यांनी तुर्कीसाम्राज्य अत्यंत विस्तृत करून टाकले. ते मोठे मुत्सद्दी, चराक्रमी, न्यायी व दिलदार सुलतान म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांनी आपल्या कारकीर्दीत तुकचे वैभव कळसास पोहोचविले. इतिहासकोरांनी त्यांना ' वैभवशाली सुलतान' म्हणून गौरविले आहे.