पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुधारण। बनि झुकूम काढला होता. कमालपाशांना शेतकीचे इतके महत्व बाटले की, त्यांनी जाहीरपणे सांगितले, १६ आतां राष्ट्राने कांहीं दिवस राजकारण आजबात सोडून द्यावे व शेतकी आणि व्यापार याचा उत्कर्ष कसा होईल याच्याकडे लक्ष्य पुरवावे.' शेतकी फार्मच्या काठावरील मातीच्या ढिगावर बसून कमालपाशा आपले राष्ट्र धनधान्याने समृद्ध झाले आहे अशी चित्रे मनःचक्षसमोर आणीत व त्यांत दंग होऊन जात. शेतकीकडे पुढे पुढे तर त्यांचे इतके लक्ष्य लागले की, महत्वाची कामे देखील बाजूला ठेवून ते न चुकतां शतकी फॉर्मकडे येत. हातांत नांगर धरून जमीन कुळदण्यांत, जमीनीची मशागत करण्यांत त्यांना अत्यंत आल्हाद वाटे. कित्येकवेळां चिखलाने भरलेले हात घेऊन, ते परराष्ट्रीय मंत्र्यांशी संभाषण करीत. जगातील एक महान योद्धा आता शेतकरी बनलेला पाहून त्या मंत्र्यांना सानंद आश्चर्य वाटे. सगळीकडे उजाड व निकस झालेच्या जमिनीची मशागत सुरू झाली. ठिकठिकाणी कालवे काढण्यात येऊन शेतांमध्ये पाणी खेळविण्यात आले. आधुनिक पद्धतीच्या अवज़ारांचा अवलंब करण्यांत येऊ लागला. गरीब शेतक-यांना मदत करण्याकरिता