पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऑी छपा। नेतृत्वाखाली शहरांची सुंदर आखणी केली. शहरात ठिकठिकाणी छहान लहान बंगीचे उठविण्यात आले. रस्त्यांच्या बाजूला सुंदर बृक्ष लावण्यांत आले, कमालयाशांनी शेतकीला उत्तेजन दिले. एका दरीमध्ये त्यानी एक सुंदर मॉडेल फॉर्म तयार केला होता. सकाळी उठल्याबरोबर घोड्यावर बसून ते या फार्मकडे येत. शेतकी सुधारणेचे प्रयोग या फार्ममध्ये चालले होते. शेतकीला उपयुक्त अशी आधुनिक अवजारे त्यांनी मागविली होती. त्याचप्रमाणे उस्कृष्ट बैलांची पैदास व्हावी म्हणून त्यांनी मोठमोठी बक्षिसे लाविली. जनावरांना सकस अन्न कसे मिळेल, जनावरें धुष्टपुष्ट कशी राहतील, उत्कृष्ट खत कसे तयार करता येईल याचे प्रयोग शेतकी तज्ज्ञांकडून चालू होते. या शेतकी प्रयोग शाळेत यशस्वी झालेले प्रयोग वर्तमानपत्रांचे द्वारा जाहीर केले जात. शेतकीकरितां एक भाग राखन ठेवलाच पाहिजे अशी कमालपाशांनी वर्तमानपत्रकारांना सक्त ताकीद दिली होती. कोऑपरेटिव्ह सोसायट्या व शेतकी बँका यांनी शेतक-यांना उत्कृष्ट बी बीयाणे फुकट पुरवावी असा १४