पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

খ্রীষ্টে देऊन ती सदृढ आहे असे सर्टिफिकेट दाखल केल्याखेरीज त्यांना विवाह करण्यास बंदी करण्यात आली. पूर्वी प्रमाणे वाटेल त्या रोग, जर्जर माणसाने उठावे व लग्न करावे अशी जी परिस्थिती होती ती नष्ट झाली. सदृढ व वीर्यशाली प्रजा निर्माण व्हावी या हेतूनेच सदर बिल पास करण्यांत आले. त्यानप्रमाणे तुर्की पुरुषांनी परकी स्त्रियांशी लग्न न करता, तुक स्त्रियांशीच लग्न केले पाहिजे अशी सक्ति करण्यांत आली. शुक्रवार हा सुट्टीचा दिवस ठरविण्यात आला. लहान लहान मुलांना आक्षिप्त सिनेमा पाहाण्याची किंवा हॉटेलमध्ये जाण्याची बंदी करण्यांत आली. रस्त्यांतून भीक मागत फिरणे हा गुन्हा समजण्थांत येऊ लागला. स्वदेशी मालाला उत्तेजन मिळावे म्हणून कमालपाशांनी आपले सर्व कपडे ओबडधोबड अशा स्वदेशी कापडाचेच बनविले. व्यापारी लोकांनी आपला हिशेब व पत्रव्यवहार तुर्की भाषेतच ठेवावे असा कायदा जारी करण्यांत आला. तुर्कस्थानामधील प्रमुख शहांची रचना अद्यावत व सुदर करण्याकरितां कमालपाशांनीं बनहून प्रोफेसर जेनन आणि व्हीयन्नाहून प्रो. ओली या तज्ज्ञांना बोलावून आणून त्यांच्या ३३३