पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपायात १ माझी आठवण कर, ह्मणजे मी तुझ्या सहायार्थ धावून येईन.तुझ्या पूर्वीच्या पॅट्रीआस जे अधिकार व हक्क होते ते सर्व तुजकडे चालत राहतील, असेहि सुलतानाकडून त्याला अभिवचन मिळाले. महंमदाच्या उलट विचारसरणी हंगेरीचा देशभक्त हुन्याडी याची होती. कॉन्स्टॅटिनोपल हस्तगत झाल्यास मी तेथील ग्रीक चर्च मोडून कॅथोलिक चर्च उभारन' हे हुन्याडीचे कोते व आत्मघातकी विचार कोठे आणि फत्ते महंमदाचे उदात्त व सर्वसंग्राहक विचार कोठे ? तत्कालिन ख्रिस्ती व मुसलमान राजांत अंतर होते ते हेच होय. महंमद ह्मणत असे, • आमच्या प्रत्येक मशिदीशेजारी तुमचे चर्च बांधले जाईल व त्यांत प्रार्थना करावयास तुम्हांस सदर परवानगी राहील. जिंकलेल्या प्रजच्या मनावरील जखमस सतत चिघळीत बसण्याचे खुनशी व अनुदार धोरण महंमदास पसंत नव्हते.* फत्तेमहंमद यांनी ठिकठिकाणी शाळाकॉलेजें उघडली; दुवाखाने बांधले. विद्वान लोकांना तर त्यांचा कायम उदार आश्रय

  • वा. कृ. भावे • तुर्काचे साम्राज्य ' पान २७-२८

०८:०३-4E..:::