पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ব্রা । जगातील इतर संस्कृतीची भर आपल्या संस्कृतीत टाकली पाहिजे. जगामध्ये जे कांहीं सत्य, शिव आणि सुंदर असेल ते सर्व आपण आत्मसात करून आपल्या देशास सुसंस्कृत केले पाहिजे. ” । वरील शब्दांत ग्रथित केलेले ध्येय साध्य करण्याकरिता कमालपाशांनी भगीरथ प्रयत्न सुरू केले. तुर्की जनता आचार विचारांत मागासलेली असल्यामुळे, तिला क्षित करण्याकरिता कमालपाशांनी शिक्षकाची भूमिका स्वीकारला. एकाद्या शिक्षकाप्रमाणे सामोपचाराने जमले नाहींतर आग्रह वरून किंवा वेळप्रसंगी जबरदस्ती करून आपझ्या देशबांधवांना शिक्षित करण्याचा कृतनिश्चय केला. पूर्वचा बेडौल, अव्यवस्थित वेष बदलून पाश्चात्य धर्तीचा सुटसुटीत, डौलदार व आकर्षक वेष घ्यावयास त्यांनी आपल्या राष्ट्रास शिकविले. जनतेच्या मनावर पूर्वसंस्कारांची इतकी पुढे चढली होती की, ते काढून टाकण्यास कमालपाईना कायद्याचा आश्रय घ्यावा लाला. नवीन पद्धतीचा वेष करावया लोकांची । नाखुषी दिसताच त्यांना सक्तीचा कायदा करावयास लावला, कमालपाशांनी परदेशाहून तज्ञ कायदेपंडीत बोलावून त्यांच्या साहाय्याने इटालीयन व स्विस सिव्हील कायद्याच्या धर्तीवर नवीन कायदे जारी केले. या नव्या कायद्यामुळे तुर्कस्थानाचे सामाजिक स्वरूप पार बदलून गेले. स्विस कायद्यामुळे कौटुंबिक