पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २६ के -- --- सुधारणा.

कमालपाशांचा मागे एकदांचा निष्कंटक झाला. त्यांनी दुप्पट उत्साहाने आपले स्वीकृत कार्य सुरू केले. आपले राष्ट्र नमुनेदार केव्हा होईल याचा त्यांना ध्यास लागला होता. राजकारणाप्रमाण तुर्कस्थानाच्या आर्थिक व सामाजिक रचनेत आमुलाग्र क्रांति करण्याचा त्यांनी निश्चय केला. तुर्की समाज म्हणजे अव्यवस्थित अजागळ व पुराणमतवादी लोकांचा समूह असा जो दुलौकिक सान्या युरोपभर पसरला होता तो नाहींसा करून, आपला समाज कार्यक्षेत्र व सुसंस्कृत करण्याचा त्यांनी चंग बांधला. आपल्या राष्ट्राची सर्वांगीण उन्नती ज्या ज्या मार्गांनी होण्यासारखी आहे ते सर्व मार्ग अमलात आणावयाचा त्यांनी कृतनिश्चय केला,

    • साच्या जगाला आदर्शभूत होऊन राहील अशा प्रकारचे आपलें राष्ट्र बनविण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.