पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विरोधकांचा निःपम्त सक्त नजर ठेवण्याचे हुकूम कमालपाशांनी पोलीसखात्याला दिले. आज नाहीं उद्या हे पुढारी पुराव्यासह सांपडल्याखेरीज राहावयाचे नाहींत अशी कमालपाशांची खात्री झाली. कमालपाशांचा अंदाज, थोड्याच दिवसांत, बरोबर ठरला. स्मनला भेट द्यावयाचा कमालपाशांचा कार्यक्रम नक्की ठरला होता. कमालपाशा स्मन येथे येण्याच्या एक दिवस अगोदर कमालपाशांवर खिडकीतून बँइम्ब फेकून त्यांना ठार मारण्याच्या एक मोठा कट उघडकीस आला. या कटवाल्यांजवळ कांहीं पत्रेही सांपडली. या या कटाची पूर्ण चदकशी केल्यानंतर, त्या कटामध्ये पुढा-यांचा व अनेक मोठमोठ्या मंडळींचा हात आहे असे दिसून आले. सर्वांना पोलीसांनी ताबडतोब गिरफदार केले. स्वतंत्र न्यायमंडळासमोर चवकशी होऊन कमालपाशांच्या या सर्व राजकीय प्रतिस्पयना देहांत प्रायश्चिताची शिक्षा फर्माविण्यांत आली. मृत्युपत्रकांवर कमालपाशांनी सह्या केल्यावर त्या सर्व गुन्हेगारांना एक मोठ्या चौकांत फाशी देण्यात आले. -~ - ३१६