पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गरी सागाला होता. कमालपाशांचा नाश कसा होईल व पूर्वीच सुलतानांची राजवट कशी प्रस्थापित करता येईल याविषयी त्यांचे रात्रंदिवस कट चालले होते. कमालपाशांना ठार मारण्याचे दोन वेळा प्रयत्न केले गेले. एकदा त्यांच्या अंगावर बाब फेकण्यांत आला; पण ते सुदैवाने बचावले. दुस-या वेळी त्यांच्या अन्नांतून विघयोग करण्यांत आला, त्यांतून ते मोठ्या मुष्कीलीने वाचले. कमालपाशांची नवी राजवट उलथून पाडण्याचे अराजकांचे कांहीं बेत उघडकीस आले. या अराजकांमध्ये असेंब्चे कांहीं सादही होते. त्यांचे पारिपत्य करण्याकरितां, सर्व इष्टभर पसरलेल्या राष्ट्रद्रोह्यांना वठणीवर आणण्याकरितां, व राजकीय प्रतिस्पध्याना पायबंद घालण्याकरितां अँड नॅशनल असेंब्लीने सध्या चाललछा राज्यघटना तात्पुरती तहकूब करून कमालपाशांना सर्वाधिकारी नेमल. आपल्या हाती संपूर्ण सत्ता येतच, कमालयाशांनी मुद्रावर नियंत्रण घातले, सध्याच्या राजपद्धतीवर नुसती टीका केला तर तो राजद्रोह ठरविला, राजद्रोह्यांची चवकशी करण्याकरिता स्वतंत्र न्यायमंडळे नेमली. या न्यायमंडळांनी सबंध राष्ट्रभर फिरून चवकशी केली व अराजकांस सक्त शासन केले. अराजकाच्या पुढा-यांविरुद्ध अद्याप पुरावा गोळा झाला नव्हता, त्यामुळे या पुढा-यांचा बंदोबस्त कमालपाशांना करता येईना, त्यांच्यावर २१८