पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निरोधकांचा नि:पात कुर्द लोकांच्या या बंडामुळे संबंध तुर्की जनता खडबडून जागी झाली. हे बंड यशस्वी झाले तर नुक्केच जमीन धक्ल थाहणारे प्रजासत्ताक राज्याचे रोपटें जळून जाऊन पुन्हा तुर्कस्थानामध्ये मयंकर यादवी माजणार असे उद्गार समंजस तुर्काच्या तोंडून निघू लागले. हा बांका प्रसंग ओळखून कमालपाशांनी संबंध राष्ट्रास हुशियार राहण्यास सांगितले आणि मदतीची याचना केली. कमालपाशांनी मदतीची पुकार केश्याबरोबर तुर्कस्थानाच्या प्रत्येक भागांतून, प्रत्येक प्रांतातून, प्रत्येक शहरांतून, सर्व दर्जाच्या तुर्की नागरिकांकडून इतकेच नव्हे तर तुर्की स्त्रियांकडून ६ आम्ही मदत करावयास्तु तयार आहोत,' अशा तारावर तारा येऊ झागच्या | कमालपाशांनी आपल्या सैन्यास आज्ञा दिली. दोन महिन्यांच्या आत त्या सैन्याने बंडाचा बीमोड करून टाकला. कमालपाशांनी त्या प्रांतात लष्करी न्यायमंडळे पाठवून दिली. या न्यायमंडळांनी चवकशी करून हजारों देशद्रोही कुर्द लोकांना भयंकर शासन दिले. जवळ जवळ ४६ पुढा-यांना भरचौकांत फासावर लटकावण्यांत आले. यानंतर कमालपाशांनी आपल्या राजकीय प्रतिस्पध्यांवर नअर फिरविली. या प्रतिस्पध्र्यांना कमालपाशांचा फार हेवा वाटत ११%