पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कौटुंबिक आपली । पव व करतां लतीफा खानमनीं आपलें व्रत तसेच पुढे चालविलें. कित्येक वेळां तत्वाकरितां त्या कमालपाशांवर कडक टीका करीत. कमालपाशा व लतीफाखानम यामधील खटके सारखे वाढतच गेले. दोघेही करारी, बाणेदार व स्वतंत्र वृत्तीचे असल्यामुळे कुही हार खात नसे. दुर्दैवाने त्यांना अपत्य नसल्यामुळे, त्यांच्या मधील वाढत्या तेढीस पायबंद बसण्याजोगे आणखीं कांहीं साधन नव्हते. शेवटीं कमालपाशांनी लतीफा खानमश घट्स्फोट केला. आतां कुमालपाशांना कसलेही कौटुंबिक बंधन राहीले नाहीं. घरांत मन लागत नाही म्हणून कमालपाशा सरकारी कामकाज करण्यांत व तुर्कस्थानाची पुनर्घटन करण्यांत सर्व दिवस घावू लागले.


=-

-

= ३१५