पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जशी मालपाशा सुरवातीस काढले होते. आपली आई म्हणजे आपल्या मागे असणारी एक प्रचंड शक्ति आहे, असे त्यांना वाटे. आज आपणांस आपकी आई रोडून गेल्यामुळे या जगांत आपण एकाकी झालों या विचाराने कमालपाशांना अत्यंत दु:ख झाले. त्यानंतर थोड्याच काळांत कमलपाशांची व त्यांच्या सुविद्य पत्नी लतफा खानम यांची ताटातूट झाल्यामुळे, त्या दुःखांत अरच पडली. लग्न झाल्यानंतर वर्षभर कमालपाशांचे आयुष्य सुखाचे गेले. कमालपाशाचे लतीफा खानमवर अतिशय प्रेम होते. लतीफा खानम याना ते क्षणभरही विलंबत नसत. पत्नी म्हणूनच नव्हे, तर सहचरी म्हणून ते त्यांच्याशी मोकळेपणाने वागत. काम करतांना, रणांगणावर जातांना किंवा सैन्याची पहाणी करतांना लतीफा खानम सदैव त्यांच्या बरोबर असत. आपल्या पत्नीच्या अखंड सहवासांत त्यांना फार अल्हाद वाटत असे. पण हे सुखाचे दिवस झटकन् निघून गेले. लतीफा खानम या स्वतंत्रवृत्तीच्या व बुद्धिमान असल्यामुळे, राजकारणात कमालपाशांशी त्यांचे खटके उडू लागले. जोपर्यंत त्या सामाजिक चळवळीत भाग घेत होत्या तोपर्यंत कमालपाशांनी तोंडातून ब्र काढला नाहीं. पण राजकारणांत त्या भाग घेऊ लागल्या त्यावेळी तसे न करण्याविषयीं कमालपाशांनी सूचना केली; पण त्यांची ३१४