पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कौटुंबिक आपत्ती ! किर्तीचा उच्चांक गाठलेला पाहून जुबेदा खानम कृतकृत्य झाल्या व मोठ्या आनंदाने त्यांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला. आपझ्या आईच्या प्रकृतीला बरे वाटावे म्हणून कमालपाशांनी अत्यंत परिश्रम घेतले. आपल्या परमपूज्य मातेचे दर्शन घेतल्याखेरीज त्यांनी एक दिवसही सुना घालविला नाही. आपल्या आईला अंगोराची उष्ण हवा मानवत नाही म्हणून कमालपाशांनी त्यांना स्मन येथे आणले. त्यांची प्रकृति सुधारावी म्हणून त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. पण त्याचा कांहीं उपयोग न होतां जुबेदा खानम कालवश झाल्या. कमालपाशांचे आपल्या आईवर निरतिशय प्रेम होते. * जगांमध्ये विश्वास ठेवण्यासारखी एकादी व्यक्ति असेल तर ती आईच' असे नितांत सुंदर व अमर उद्गार कमालपाशांनी काढले आहेत. आपत्यावर टीका करण्याचा अधिकार कुणाला असेल तर तो फक्त आपल्या आईलाच असे ते नेहमी म्हणत. आपल्या आईखेरीज त्यांनी कुणाचीही टीका सहन केली नाही, असे त्यांच्या आयुष्य कथेवरून आपणांस म्हणता येईल. आपल्या आईचे साधुवृत्तीचे बोल ते अत्यंत आदरपूर्वक ऐकत असत. जगामध्ये आपणास कुणी जरी थारा दिला नाहीं तरी शेवटी आपली आई आपणांस थारा देईल असे उद्गार कमालपाशांनी आपल्या क्रांतिकारक आयुष्याच्या ३१