पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रकरण २७ वें -XX--- ਨਈ॥ ਅਬ कौटुंबिक आपत्ती ! > आतां कमालपाशा एकमताने तुर्कस्थानाचे कर्णधार झाले. तुर्कस्थानच्या कानाकोप-यामधून त्यांचा किर्तीघोष सुरू झाला. तुर्कस्थानाच्या इतिहासांत आतांपर्यंत कुणीही मान मिळविला नाही इतका मान कमालपाशांनी मिळविला. आपल्या मातृभूमीचा उद्धारकर्ता म्हणून तुर्कस्थानामधील आबालवृद्ध त्यांच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहू लागले. आपल्या राष्ट्राचा स्वातंत्र्यदीप म्हणून त्यांचा गौरव होऊ लागला. आपल्या देशाच्या नसनसति नवचैतन्य ओतणारा महापुरुष म्हणून प्रत्येक तुर्क त्यांच्याकडे अमिमानाने पाहू लागला. कमालपाशांनी आपल्या आयुष्याचे सार्थक केले; आपल्या मातेचा कुसवा धन्य केला. आपया पोटच्या मुलाने मानाचा व