पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा वालशिया, बोस्निया व ग्रीस येथील राजकत्यास आपले मांडलीक बनविले. सव्हियाच्या राजाने आपल्या बहिणीचे बायजादशी लग्न लावून दिले. बायजीद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पांच मुलांत गादीसाठी तंटे लागले. शेवटी सर्वांत धाकटा मुलगा महमंद याने गादी पटकाविली; पण अवघी ८ वर्षे राज्याचा उपभोग घेऊन तो वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी वारला. त्यानंतर दुसरे मुराद ( १३२ १-१ ४५१ ) गादीवर आले. त्यांनी दिर्घकाळ सुलतानपद भोगले. त्यांच्या अमदानींत युरोपांतील ख्रिस्ती राष्ट्रांनी एकजूट करून, तुर्कवर हल्ला केला; पण मुराद यांनी ख्रिस्ती राष्ट्राच्या सैन्याचा धुव्वा उडवून दिला. मुरादनंतर फत्तेमंहमद ( १४५१-१४८१ ) सिंहासनावर बसले. अत्यंत बुद्धिमान व पराक्रमी सुलतान ह्मणून फत्तेमहंमद यांनी ख्याती संपादन केली. त्यांनी कॉन्स्टाटेनोपल, हे अत्यंत महत्वाचे शहर, ग्रीक बादशहापासून जिंकून घेतले. कॉन्स्टॅटिनोपल जिंकल्यानंतर फत्तेमहंमद यांनी ग्रीक धर्मगुरूला बोलावून आणले व त्याची आचार्य पीठावर स्थापना केली. फत्तेमहंमद यांची परधर्मसहिष्णुता किती श्रेष्ठ दर्जाची होती याची कल्पना खालील उता-यावरून येईल:-- । ६ मी तुझी पॅट्रीआर्क ह्मणून नेमणुक करीत आहे. ईश्वर तुझे रक्षण करा. तुझ्यावर प्रसंग आला तर