पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खिलापतीचा शेवट नाही, इतकेच नव्हे तर, तरुण तुर्कीस ब साच्या इस्लामी जगास नापसंत असलेल्या सेव्हर्सच्या तहावर सही करण्यासही सुलतानास दिक्कत वाटली नाहीं. लॉसनेच्या तहाचे वेळीं कमालपक्षास स्वतंत्रपणे दोस्तांशी तह करण्याचा अखत्यार नाहीं असे म्हणून सुलतान आडवा आलाच होता. कमालपक्ष स्वतंत्रपणे भरभराट पावून ग्रीसला तंबी पोचविण्यास चुकला असता, तर सुलतानाचे तहाने तुर्कस्थानास सध्यांचे बरे दिवस खात्रीने पहावयास मिळाले नसते. कोणताही सुलतान गादीवर असला तरी तो राष्ट्राची प्रगती अडवून धरतो व राष्ट्राचा घात करतो असा एक शतकभर अनुभव आल्यामुळेच कमालपाशास पदच्युतीचें निर्वाणीचे अस्त्र काढावे लागले. सुलतान या नात्याने राजकीय सत्ता हातची सोडावयास नको आणि खलीफा या नात्याने मुसलमानांचे धार्मिक वर्चस्व खिस्ती, यहुदी या परधर्मीयावर लादावयास पाहिजे हे सुलतानांचे जुनें पुराणे घातकी धोरण कमालपाशा आदिकरून उदारमतवादी मुत्सद्यांस मुळींच पटण्यासारखे नव्हते. १०९।