पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी फमापाशा पडल्याबरोबर त्याची अंमलबजावणी झाली. मध्यरात्रीं गव्हर्नर स्वतः लष्करी तुकडी घेऊन खलीफांच्या निवासस्थानी गेला ब त्यांना मोटारीत बसवून व थोडेसे पैसे प्रवासखर्चाकरितां देऊन दिवस उजाडण्याच्या अगोदर तुर्कस्थानाच्या सरहद्दीपलीकडे स्वित्झर्लंडच्या हद्दीत पोहोंचविले. अशा रीतीने आज कित्येक वर्षे राज्यपद व धर्मपद विभूषित करणाच्या खलीफांचा शेवट करण्यांत आला. त्याचप्रमाणे खलीफाचा परिवार, त्यांची प्रभावळ यांचीही सरहद्दीपलीकडे रवानगी करण्यांत आली. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या गोष्टीचा निषेध सबंध तुर्कस्थानभर एकाही जागी झाला नाही. खिलाफतीचे विसर्जन झाले तेव्हां तुर्की जनता मुग्ध का राहिली याचे एका ग्रंथांत पुढील मार्मिक वर्णन आले आहेः--

  • महायुद्धांत तरुण तुर्क पराभूत झाल्यावर कॉन्स्टॅटिनोपल शहरी १९१९ ते १९२२ पर्यंत दोस्तांच्या सैन्याची छावणी होती. त्यावेळी जवळ ना पैसा ना सैन्य अशी सुलतानाची हलाखीची परिस्थिती होती. अशाही विपन्नावस्थेत तरुण तुकीशी मिळते घेऊन साम्राज्य शक्य तितके जतन करण्याची बुद्धि सुलतान व तत्पक्षीथ यांस झाली

२०६