पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिलापतीचा शेवट ही परिस्थिती नष्ट करण्याकरितां राजकारण व धने यांची फारकत । करणे हेच आज शहाणणाचे ठरणार आहे. खलीफांच्या गादीचे । उच्चाटण याचा अर्थ इस्लामधर्माचे उच्चाटण असा मात्र कोणी करू नये. या आमच्या प्रजासत्ताक राज्यांत प्रत्येक व्यक्ति अपआपला धर्म पाळण्याची पूर्ण मुभा राहणार आहे. व्यक्तीचा धर्म छिनावून घेण्याची किंवा त्यांत ढवळाढवळ करण्याची आमची मुळीच इच्छा नाही. धर्माचे क्षेत्र राज्यापुरते न राहतां ते व्यक्ति पुरते राहील. राज्य है धर्मभेदातीत राहावे व राहिले पाहिजे. हेच व्यापक ध्येय आम्हीं अमलात आणणार आहात. आपल्यासमोर जे बिल मांडले आहे त्याबद्दल जनतेने आपला गैरसमज करून घेऊ नये. राष्ट्राच्या कल्याणकारितां कांहीं गोष्टी करणे भाग असते. त्यापैकीच ही एक गोष्ट आहे हे आपण ध्यानांत धरा.' अशा त-हेचे बुद्धीप्रधान व वळवळीचे भाषण झाल्यानंतर ते बिल एकमताने पास झाले. या महत्वाच्या बिलावर वादविवाद न होतां तें पास झाले ही गोष्ट लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे. त्याच दिवशी रात्री इस्तंबूलच्या गव्हर्नरास कमालपाशांनी हुकूम पाठविला की, दिवस उजाडण्यापूर्वी खफा अबदुल भजीद तुर्कस्थानची हद्द सोडून गेले पाहिजेत. हुकूम हातांत ९०६