पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खिलापतीचा बट खलीफा अबदुल मजीद यांची आतां धडगत नाही तेव्हां कमालाशांनीच अखिल मुसलमानांचे खलीफा व्हावे अशी विनंती प्रत्येक राष्ट्रांतून करण्यांत आली. हिंदुस्थान व इजिप्त या देशांतून मुसलमानांची शिष्टमंडळे कमालपाशांचे भेटीस आली. कमालपाशांनी खलीफा बनावे अशी त्यांनी आग्रहपूर्वक विनंती केली. खलीफांचा दर्जा मिळणे ही अत्यंत मानाची गोष्ट होती. शिवाय खलीफाना शोभण्यासारखे व्यक्तिमत्व त्यांच्या ठायी होते. पराक्रमी योद्धा, महान मुत्सद्दी, स्वतंत्र मुसलमानांचा राज्यकर्ता व अखिल दुनियेमधील एक सर्वश्रेष्ठ व्यक्ति असा त्यांचा लौकिक होता. पण कमालपाशा हे तत्वनिष्ठ असल्यामुळे हा मिळणारा किंबहुना आपण होऊन चालत आलेला मान त्यांनी साभारपूर्वक नाकारला. राजकारणी व्यक्तीने धार्मिक अवडंबरापासून दोन हात दूर राहिले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. राजकारण व धर्म एकत्र येता कामा नये अशी त्यांची मनीषा होती. शिवाय आजच्या नाजूक परिस्थितीत येथील खलीफाची गादी नष्ट करणे किती अगत्याचे आहे हेही त्यांनी बोलून दाखविले. दुसच्या एकाद्या मुसलमानी राष्ट्रांत जावे व तेथील राज्यकर्त्यांना खलीफा होण्याची विनंती करावी असेही त्यांनी सुचविले. कुठल्याही परिस्थितीत तुर्कस्थानामध्ये खलीफा किंवा त्यांची प्रभावळ आपण ३०