पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझी कमालक्षिा बनवून कमालपाशांची प्रजासत्ताक राज्यपद्धती धुळीस मिळविण्याचे धाडसी बेत चालू केले. बिचारे भोळे खलीफा! त्यांनी मागचा पुढचा विचार न करतां या सर्व लोकांस आश्रय दिला. आपण देशद्रोह्यांस व समाजद्रोह्यांस आश्रय देऊन राष्ट्राचा अक्षम्य गुन्हा करीत आहोत याची त्या बिचाया खलीफांना जाणीव देखील नव्हती. कमालपाशांना ही हकीकत कळल्या नंतर त्यांना फार संताप आला. खलीफानी अभय दिलेल्या या घातकी लोकांचा नि:पात करावा तर धार्मिक असणारी जनता खळून उठेछ; बरे न करावा तर खलीफा व त्यांच्या सभाँवार जमलेली देशद्रोह्यांची मजलिस, प्रजासत्ताक राज्यपद्धतीस केव्हां भवेल यांचा नेम नव्हता. कमालपाशापुढे जबरदस्त पेच येऊन पडला. या पेचातून मुक्त होण्याचा मार्ग त्यांना शोधणं आवश्यक होते; कारण वाटेल ती राष्ट्रद्रोहाची कृत्ये करावी आणि खलीफांच्या आश्रयाला जावे असा प्रघात सुरू झाला तर राष्ट्रास स्वास्थ्य लाभणे केव्हाही शक्य होणार नव्हते. खलीफाभोवती जमलेल्या या लोकांना वेचून कानून त्यांना देहांत शासन दिले २२