पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पहिले अध्यक्ष पाडून टाकण्याचा त्यांचा निश्चय आहे, पवित्र कुराण वाचावयास बंदी करावयाचे त्यांचे धोरण आहे; अशा एक ना दोन हजारों खोट्या गोष्टी जाहीरपणे समाजापुढे मांडून कमालपांशा व त्यांचे तरुण तुर्क अनुयायी याविषयी लोकमत कलुषित करण्यास सुरवात केली. मशिदीमध्यें, बाजारपेठेत, चौकाचौकांत या धर्महीन राज्यकत्र्यांपासून संभाळून असा, अशा त-हेची पत्रकें लाविली गेली. | कमालपाशांचा उत्कर्ष सहन न होणावा व त्यांना सदैव पाण्यांत पाहणा-या त्यांच्या राजकीय प्रतिस्पृष्यनीं भुलामौलवींच्या या कृत्यास प्रोत्साहन दिले. कमालपाशांच्या कानावर या सर्व गोष्टी गेल्या असून, त्यांनी पूर्ण बंदोबस्त करण्याचे ठरविलें असल्याची बातमी, कमालपाशांचे राजकीय प्रतिस्पर्धी व मुल्लामौलवी यांच्या कानावर जातांच ते सर्व खलीफा अबदुल मजीद यांच्या आश्रयास गेले. खलीफा हे जगांतील सर्व मुसलमानांचे धर्मगुरु आहेत, तेव्हां त्यांच्या आश्रयास जाऊन राहिल्यास आपणांस काडीचीही भीति नाहीं असे त्या अर्धवट राजकारणी प्रतिस्पर्थ्यांना व खुळ्या मुलामौलवींना वाटले. खलीफांच्या निशाणाखाली जमल्यावर त्यांनी निर्भयपणे कमालपाशांविषयी लोकमत बिघडविण्याचे कार्य सुरू केले; इ केंच नव्हे तर, खलीफानाच तुर्कस्थानाचे बादशहा २ • !