पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात आरखान मागून मुराद गादीवर आले.अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी राजा म्हणून मुराद यांनी किर्ती मिळविली. आद्रीयानापलसुद्धा सर्व श्रेस प्रांत जिंकून त्यांनी युरोपमध्ये आपला ध्वज फडकावला. त्यांच्या पराक्रमाला भिऊन कॉन्स्टॅटिनोपलचा बादशहा जॉन मांडलीक बनला. थोड्याच दिवसांत बल्गेरिया व सव्हया या देशांवर तुर्कीनी स्वारी केली व तुर्कीनी हे दोन्ही प्रदेश जिंकले. बल्गेरियाच्या राजाने आपली बहीण सिसयन हिचा सुलतान मुराद । यांच्याशी विवाह लावून दिला व तुर्की सुलतानांनी युरोपियन राजांच्या कन्यकांशी लग्न लावण्याची कायमची प्रथा पडून गेली ! * सर्व आटोमन सुलतानांमध्ये मुराद हा अत्यंत सज्जन व धर्मभोळा होता. तो जसा शूर तसा मुत्सद्दीही होता.* सुलतान मुराद यांच्या काराकर्दीत तुर्कीसाम्राज्य पांचपट मोठे झाले आणि म्हणूनच मुराद यांची अत्यंत वैभवशाली तुर्की बादशहांत गणना केली जाते. _. मुराद मागून त्यांचे चिरंजीव बायजीद (१३८९-१४०३) वयाच्या ३४ व्या वर्षी गादीवर बसले. बायजीद यांनी आपल्या कारकिर्दीत आशियामायनरचा बराचसा मोठा भाग, मॅसिडोनीया, उत्तर बल्गेरिया, थिसली हे प्रदेश आपल्या राज्यास जोडले व श्रीमंत सरकार तात्यासाहेब पटवर्धन, राजसाहेब मिरजकृत * आडोमन साम्राज्याचा उत्कर्ष ' पान ३९