पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गौं कमालपाशा तुर्कस्थानामध्ये होते हैं आपण मार्गे पाहिलेच आहे. ज्ञानाची पोकळ घमेंड, दिखाऊ लोकसेवा आणि घमचा खोटा अभिमान ही त्या मुलामौलवीची आयुधे होती. कमालपाशा तरुण होते तेव्हापासूनच ते व त्यांचे अनुयायी मुल्लामौलवींच्या विरुद्ध होते. या मुलामौलवींचे बंड मोडल्याशिवाय आणि त्यांचा बीमोड केल्याशिवाय राष्ट्राचा उत्कर्ष होणार नाही किंवा राज्यपद्धती सुरळीत चालावयाची नाहीं असा त्यांनी बिनचूक आडाखा बांधला होता. आपल्या खाथोकरिता समाजांमध्ये बेदिली फैलविण्यास किंवा धर्मभेदातीत राज्यपद्धतात धर्माचे खूळ माजवून तिचा विचका करावयास हे लोक मागेपुढे पाहावयाचे नाहीत असा त्यांचा ठाम सिद्धान्त होता. आणि कमालपाशांचा हा सिद्धान्त खरा ठरला. कमालपाशा सर्वाधिकारी झाल्याबरोबर या मुल्लामौलवींची पांचावर धारण बसली. हा गृहस्थ आपली पाळेमुळे खणून काढल्याखेरीज राहणार नाही हे त्यांनी पूर्णपणे ओळखले. यालाच लोळवून टाकला म्हणजे आपले बस्तान पूर्वीसारखे कायम राहील या दुष्ट हेतूने मुल्लामौलवींनीं कमालपाशा व त्यांची राज्यपद्धती याविद्ध शिंग फुकले; कमालपाशांची व त्यांच्या सहका-यांच; बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला. इस्लाम धर्माचा नि:पात करून, तुर्कस्थानाला ख्रिस्ती राष्ट्र बनविण्याचा कमालपाशांचा विचार आहे; मशिदी १०