पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पहिले अध्यक्ष मंत्रिमंडळ निवडण्याचा कमालपाशांना अधिकार दिला गेला. मंत्रिमंडळाचे अध्यक्ष, असेंब्लीचे अध्यक्ष आणि कमांडर-इन-चीफ ही सर्व जबाबदारीची कामे कमालपाशांनीच करावीत, असे असेंब्लीने ठरविल्यावर असेंब्ली बरखास्त झाली. दुस-या दिवशी सर्व प्रमुख वृत्तपत्रांत तुर्की प्रजात्ताक राज्याविषयी अभिनंदनपर अग्रलेख प्रसिद्ध झाले. तुर्की राज्याची सर्व सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या राष्ट्रास युरोपियन राष्ट्रांच्या तोडीचे राष्ट्र कसे बनविता येईल याचा कमालपाशांना निजध्यास लागला. आतापर्यंत युरोपामधील ** आजारी मनुष्य, " म्हणून तुर्कस्थानाची हेटाळणी करण्यात येत होती, बेबंदशाहीचा नमुना म्हणून तुर्कस्थानाकडे अंगुलीनिर्देश करण्यांत येत होता व अजागळपणाचे प्रतीक म्हणून तुर्कस्थानाची चेष्टा करण्यांत येत होती. आपल्या राष्ट्राची चाललेली ही हेटाळणी, बदनामी आणि चेष्टा पाहून कमालपाशांचे अंतःकरण तीळतीळ तुटत असे. हा दुलिक नाहींसा करून आपल्या राष्ट्रास आदर्श राष्ट्र बनविण्याची कमालपाशांना आकांक्षा लागून राहिली होती. पण कमालपाशांच्या आकांक्षेच्या, हिमतीच्या आड येणारी एक प्रचंड धोंड उभी होती. ही धोंड म्हणजे तुर्कस्थानाला रसातळास नेणारे मुल्लामौलवी होत. या मुलामौलवींचे किर्ती भयंकर प्रस्थ १९९