पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्यक्ष असेंब्लीने तुम्हांस आग्रह केला तरी तुम्ही स्पष्टपणे नकार दर्शवा. मग पाहू असेंब्ली कसे काय राज्य चालविते ते ! शेवटी आपण ठरवू ते असेंब्ली कबूल केल्याशिवाय राहणार नाहीं दुस-या दिवशी मंत्रिमंडळाने राजिनामा दिला. दुसरे मंत्रिमंडळ बनविण्याचा प्रयत्न असेंब्लीने चालविला; पण त्यांत यश येण्याचे चिन्ह दिसेना. प्रत्येक सभासद आपआपली वर्णी मंत्रिमंडळांत लावण्याचा प्रयत्न करू लागला, याचा परिणाम असा झाला की आपआपसांत चुरस सुरू होऊन प्रकरण हातघाईवर येण्याचा रंग दिसू लागला. ज्यांच्यावर सर्व सभादांचा एकमताने विश्वास होता ते लोक कमालपाशांच्या बाजूला पडल्यामुळे, त्यांनी मंत्रिपद स्विकारण्याचे साफ नाकारले. दोन दिवस कडाक्याचे वादविवाद झाले, भांडणे झाली; पण मंत्रिमंडळ कांहीं बनले नाही. उलट मंत्रिमंडळ बनविण्याचा नादांत असेब्लीच्या सभासदांमध्ये लहान लहान गट मात्र पडले. प्रत्येक गट दुस-या गटास शिव्याशाप देऊ लागला; इतकेच नव्हे तर एकमेकाच्या नरडीचा घोंट घेण्यास उठू लागला ! शेवटी कमालपाशांना बोलावून त्यांना नवीन मंत्रिमंडळ बनविण्यास सांगावे अ अप्सेलीने एकमताने ठरविले. त्यावेळी कमालपाशा असेंब्लीस मुद्दामच गैरहजर होते. त्यांना येण्याबद्दल '११६