पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•.....।

. " प्रकरण २५ दें -- X--- पहिले अध्यक्ष

  • ** नॅशनल अँड असेंब्लीचे बरेचसे सभासद पुराणमतवादी होते हे आपण मागे पाहिलेच आहे. त्यांना कमालपाशांची प्रजासत्ताक राज्यपद्धती पसंत नव्हती. थोडाफार फरक करून आतापर्यत चालत आलेली राज्यपद्धतीच पुढे चालू करावी असा त्यांचा आग्रह होता. कमालपाशांनी तर तुर्कस्थानामध्ये प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित करण्याचा निर्धार केला होता. हा निर्धार पार पाडण्याकरितां त्यांनी एक राजकीय पेचप्रसंग निर्माण केला.

अँड नॅशनल असेंब्लीने नेमलेल्या सर्व मंत्र्यांना कमालपाशांनी एक दिवस आपल्या घरी जेवावयास बोलाविल जेवण झाल्यानंतर कमालपाशा म्हणाले, “ तुम्ही सर्वांनी आपआपले राजिनामे द्यावे अशी माझी इच्छा आहे. मी असेंब्लीला सर्व राज्यकारभार हाती घेण्यास सांगेन. अधिकार स्वीकार करा असा